भाकरीचा शोध
भाकरीचा शोध
इंडियाचे फिरते चाक
कुणासाठी थांबत नाही
भारतातल्या भाकरीचा शोध
मात्र अजून संपत नाही
सजलेले ताट असूनही
जीभेला खपत नाही
भारतातल्या भाकरीचा शोध
मात्र अजून संपत नाही
कॅलरीज मोजलेले अन्न एकीकडे
अन् डाएट जपत राही
भारतातल्या भाकरीचा शोध
मात्र अजून संपत नाही
समृद्ध इंडियाच्या नजरेला
दारिद्र्य खुपत नाही
भारतातल्या भाकरीचा शोध
मात्र अजून संपत नाही
