STORYMIRROR

Shila Ambhure

Tragedy

3  

Shila Ambhure

Tragedy

भाकरी

भाकरी

1 min
741


प्रसंग पाहून एक ,काळीज माझं फाटलं

भाकरीविना पोरगं, मरताना मी पाहिलं।।


सुकलेलं पोर एक , घेवुनिया कडेवर

अनवाणी पायांनी ती, माय जाई घरोघर

भूक मिटवण्या तिला,उन्हानं नाही रोखलं।।


सडकेच्या बाजूलाच, मायलेक दोघेजण

भीक मागताना कशी ,फिरतात वणवण

खेकसती सारे लोक,दान ना कोणी टाकलं।।


नव्या कोऱ्या गाडीतून, उतरले शेठ बडे

अन्नासाठी वेडी माय, त्यांच्या पायाशीच पडे

दगडाचं मन त्यांचं ,जरा नाही पाझरलं।।


भूक झाली अनावर,रडून दमले पोर

झाले एकदम शांत,उरला ना आता जोर

डोळे उघडे बाळाचे ,पापण नाही हाललं।।


उर बडवून रडे,बाळाची दुबळी माय

येता जाता सगळेच ,बोलती हाय! हाय!!

माझ्या सुन्या डोळ्यांत पाणी उभाच राहीलं।।


दाविली सहानुभूति, नाही दिला कुणी घास

उपासमारीने दिला, कोवळ्या जीवाला फास

भाकरीच्या तुकड्याचं,मोल मी आज जाणलं।


वेडी झाली ती माऊली ,फिरते ना घरोघरी

थापते दोन्ही हातांनी ,बिनपीठाची भाकरी

बडबडे स्वतःशीच,आता हाटते पिठलं।।


पाहून तो भूकबळी,ठरविले मी मनाशी

टाळा नासाडी अन्नाची, सांगते साऱ्या जनाशी

अन्नछत्रासाठी सारं, आयुष्य माझं वाहीलं।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy