भाकर /भाकरी
भाकर /भाकरी
*खाऊनी भाकर भाकर
स्वप्न होई माझे साखर*
भेटी हाताला तव्याचा चटका
मग मिळेल भाकर...
लागे खाताना गोड
मोलमजुरी करून केली चाकर...
जीव भटकला कामासाठी
ईकडे सगळे घरी उपाशी...
बाबांनी केली सोय पोटासाठी
मग झालो आम्ही तुपाशी...
ज्यांना मिळाली भाकर
ते होई मोठे सुखात...
ज्याना नाही मिळाली भाकर
ते खूप मोठे दुःखात...
म्हाताऱ्या आईला देऊ कशी मऊ मऊ भाकर
भटकुनी या सारे रानोमाळ...
मग होईल गोल गोल आकार
हंबरडा फोडून केला कानोराळ...
माय माझी घराची माऊली
तीचे करीन स्वप्न गोड...
तिची होईल मी सावली
राहील मला तिचीच ओढं...
