बघ्या
बघ्या
कुठे लागली आहे आग ?
कुठून येतोय तो धूर ??
चला बनूया बघे सगळे
कोणी तरी तिकडे लावतो सुर
धडकले का कोणी इथे ??
सापडले का कोणाचे धड ??
पळतात पोलीस कुणामागे ??
चालली कसली धरपकड ??
चढले कोणी चितेवरती
कोणाचे बांधले इथे मढे
बघ्या बघतोय उघड्या डोळ्यांने
जीव कोणाचा तसाच सडे
भूमिका घेतात मुक्तपणाने
चर्चा मात्र करतात शहाणी
बघे नुसते बघतच राहतात
फुके झाडतात मुखी वाणी
असे बघावे का नुसते
करु नये का मदत कुणी
आपत्ती जनक परिस्थिती जिथे
आपलीच माणसे तिथे उणी
