बेफिकीर
बेफिकीर
खिशात नाही दमडी फिरण्यात दंग आहेत
उपाशी पोरे घरात हे खाण्यात दंग आहेत
जगात चाललेल्या अनैतिक गोष्टीच्या
पेपरमधील बातम्या वाचण्यात दंग आहेत
लोकांना एकवेळचे जेवण मिळत नाही
हे क्रिकेटचा खेळ पाहण्यात दंग आहेत
अन्नासाठी कोणी चालतो तर कोणी
पोटासाठी सकाळी चालण्यात दंग आहेत
ईथे कुणाला नीट ऐकूच येत नाही
मोठ्या आवाजात बोलण्यात दंग आहेत
सीमेवर दुष्मनाच्या हल्लेत जवान मरतोय
कॉमेडी शो बघत हसण्यात दंग आहेत
नेहमीच जर तर ची भाषा बोलणारे
नशिबावर दोष देत रडण्यात दंग आहेत
यांना कशाचे काही देणे घेणे नाही
फक्त मौज मजा करण्यात दंग आहेत
