STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance Classics

4  

Ganesh G Shivlad

Romance Classics

बेधुंद सखा

बेधुंद सखा

1 min
529

काल सांजेला पुन्हा एकदा ,

बेधुंद सखा माझ्या अंगणी आला.

थोडा वेळ थांबतो म्हणाला ,

पण सारी रातच थांबून गेला.


जागवून सारी रात कुशीत ,

पहाटे पहाटे मला निजवून गेला.

भिजवून सारं अंगण माझं ,

स्वतःच बिचारा तो न्हाऊन गेला.


कधी रिमझिम कधी मुसळधार ,

धारेवर धार तो कोसळून गेला.

वाट पाहिली चातकांनी खुप पण ,

माझ्यासाठीच तो बरसून गेला.


खोल खोल झिरपून माझ्यात ,

सार अंग अंगण सुखवून गेला.

खेळत राहिला माझ्यासवे अन् ,

त्याचच भान तो हरवून गेला.


दुःख सावरून बाळांच माझ्या, 

मांडीवर त्यांना खेळवून गेला.

होत नव्हत देऊन सारं त्यानं,

साऱ्या सृष्टीला तोच हसवून गेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance