बेडी
बेडी
राहिली नेहमी बंधनात,
स्वातंत्र्य नाही घरात ना बाहेर,
सदानकदा अपमानाचा आहेर.
मिळाले जरी स्वातंत्र्य,
अंकुश असे पुरूषाचा,
असो मायेचा वा सक्तीचा.
झुगारून परंपरागत बेडी,
घेतली तिने उंच भरारी,
हर एक क्षेत्रात ठसा उमटवला,
दिली दाखवून तिने चतुराई.
टाकलं आता पुढचं पाऊल,
ही आहे तिच्या यशाची चाहूल.