बेभान क्षणी
बेभान क्षणी
या बेभान क्षणी गवसला
चाँद नभीचा तो एकला
गुंता या मनातला कसला
भाव क्षणाचा आज जगला
क्षितिजास प्रश्न तो कसला
काठावरी तो श्वास उरला
अश्या या बेभान क्षणाला
कातर काहुरी का मनाला
भास कोवळे त्या उनाला
आसक्ती का सावलीला
छंद तो आगळा लागला
गंधाळल्या त्या मोगरयाला
गंध कोवळ्याशा फुलाला
भान असुदे जरा मनाला
सांग उमटत्या त्या खळीला
वेळ आहे कळी खुलायला
सांग या बेभान क्षणाला
रात्र धुंदीत त्या जगायला
क्षण फितुर आहेत उद्याला
देशील का ओळख पहाटेला

