बाप्पा
बाप्पा
तूच माझा लाडका बाप्पा गणू
मी तुझीच लाडकी मनू
सोंड तुझी लांब लांब वाकळी
डोक्यावर ठेवली हिरवळ गवती साखळी
नेहमी सांगते तुला, विश्वास तुझ्यावर बाप्पा
नेहमी माझ्या जीवनातल्या मारते तूझ्या सोबत गप्पा
सुखकर्ता दुःखहर्ता तूच माझा विघ्नहर्ता..||ध्रु||
बाप्पा माझा फारच दिसतो सुंदर
नाव ठेविले तुझी सर्वांनी लंबोदर
आवड तुला मोदक , लाडवाची
ओढ मला लागली तुझ्या आगमनाची
सकाळ होताच नाव येते तुझे माझ्या मुखी
माझा बाप्पा लाडका गणपती
साथ तुझी माझ्या संकटाच्या वळणा वरती
सुखकर्ता दुःखहर्ता तूच माझा विघ्नहर्ता ||१||
दिसतो माझा बाप्पा खूपच छान
त्याला लांभ लांभ हत्ती सारखे दोन कान
नेहमी असतो माता पार्वतीचा आग्याकारी
माझ्या बाप्पाची गोष्टच खूपच न्यारी
तुझ रूप दिसते सर्वांत भारी
सर्व देवा मध्ये मिळाला तुला पहिला मान
बाप्पा उंदीर मामा आहे तुझ वाहन
सुखकर्ता दुःखहर्ता तूच माझा विघ्नहर्ता...||२||
कोणी म्हणतो गणपती कोणी म्हणतो
बाप्पा तर कोणी म्हणतो विनायक
या नावाचा तू एकटाच नायक
भोळ्या शिव शंकराचा लाडका बालक
तुझ्यात काही तरी आहे बाप्पा विशेष
म्हणून तर तुला सर्व जग म्हणते विघ्नहर्ता गणेश
सुखकर्ता दुःखहर्ता तूच माझा विघ्नहर्ता...||३||
