STORYMIRROR

Poonam Kulkarni

Inspirational

3  

Poonam Kulkarni

Inspirational

बाप्पा

बाप्पा

1 min
158

बाप्पाच्या आगमनाची

किती लगबग असायची

सगळ्याच मार्केटमध्ये,

बाप्पाचीच गजबज असायची


ताल धरण्यासाठी 

ढोल पथकांची तयारी जोरात व्हायची

रात्रंदिन जागणारी मंडळं

तुझ्या भेटीसाठी सज्ज व्हायची


दिवसभर कितीही थकलो 

तरी आरतीला तूझ्या हजर राहायचो

डोळे मिटून अगदी मनातून 

तुलाच पाहात बसायचो


भर पावसात तुझ्या स्वागताला

आस लावून बसायचो

अन् निरोप तुला देताना

बेधुंद होऊन नाचायचो


यावर्षी देवा हे सारं

मिस करत आहोत 

तुझी सेवा करत करत

एक आस करत आहोत


पुरे झालं बाप्पा

आता मिटव हे प्रकरण

परत फुलव विश्व तुझं

फुलू दे सौख्याचं तोरण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational