STORYMIRROR

SAURABH AHER

Inspirational

3  

SAURABH AHER

Inspirational

बाप

बाप

1 min
210

माझा स्वाभिमानी बाप ,

 मला शिकवलं त्यानं ..

त्याच्या कुळी जन्मा आलो

 दगडाचं झालं सोनं ...


कधी झाला तो कठोर

कधी मखमली साय ...

कुरवाळी लडिवाळे ,

बाप झाला माझी माय ..


घर रहावे सुखात ,

राबे अंगार मातीत ..

अनवाणी चालणारा 

दुःख ठेवतो छातीत ..


बाप अनमोल धन

भासे सावळी विठाई ..

मिळे त्याची पायधुळ ,

बहु जन्माची पुण्याई..


माझी भाबडी माऊली

जणू दाराची तुळस..

माझ्या हृदयमंदिरी 

बाप झालासे कळस ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational