बाप
बाप
न मोजता येणारं माप
म्हणजे आमचा बाप
आम्हा पामराची सावली
आमची खरी विठूमाऊली
दुःख सोसूनी फार
लेकरांचे स्वप्न करितो साकार
बापामुळं मिळतो जीवन नवा आकार
धगधगत्या काळजातून ललकार
बाप अमुचा आम्हा जीवनाचा आधार
बाप म्हणजे संकटावर मात करण्याचे अवजार
