STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Children

बाप

बाप

1 min
254

बाप आधार घराचा

बाप मायेचा पसारा

बाप जन्माची सावली

बाप प्रेमाचाच झरा....!!


बाप घराचं छप्पर

बाप घराचं अस्तित्व

बापाविणा जीवनाला

नाही कसले महत्त्व....!!


बाप घराची रे शान

बाप कौतुकाची थाप

मुलांसाठी राबतोया

रात्रंदिन माझा बाप.....!!


बाप करतोया कष्ट

करी लोकाची चाकरी

बाप तुझ्यामुळेच रे

लेकरांना मिळे भाकरी....!!


बाप घराचा कळस

बाप रे आधारवड

भार झेलतो घराचा

कर्ज जरी डोईजड.....!!


बाप भरलं आभाळ

बाप संकटाची हाक

बापामुळे राहतसे

साऱ्या घराला रे धाक....!!


संसाररथाची चाके

असे धन्य मायबाप

आले नयनी हे अश्रू

आठवतो माझा बाप...!!


बाप सुखाचा सागर

बाप विठ्ठल सावळा

राबराब राबतसे

विठु तो लेकुरवाळा....!!


बाप आधार जीवनी

धन्य झाले हे जीवन

बाप जगात हो थोर

बाप खरेखुरे धन.....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational