STORYMIRROR

आनंद घायवट

Tragedy

4  

आनंद घायवट

Tragedy

बाप शेतकरी

बाप शेतकरी

1 min
385


दिसभर करी मजुरी

घरा मायबाप आजारी

दु:ख सदैव उरी

करी न चुकता वारी

म्हणवून वारकरी


  

मेहनत ही फार

घरा मुलंबाळं चार

नसे क्षणिक सुखाची निज

होत नाही कष्टाचे चीज

पेरून शेतात बीज


कोणी घेत नाही हमी

नगाचा दर कमी

नांदते अठराविश्व

दारिद्र्य घरी

मी शेतकरी


धरणीमाय घालते दागिनं

तन जळतं आगीनं

कसं करु लेकीचं लगीनं

सोसतो हे घाव ऊरी

मी शेतकरी


असे जगाचा पोशिंदा जरी

यातना सोसून भारी

नसे लाभ शासन दरबारी

त्यागून आत्महत्या करी

अहो, मी शेतकरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy