Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

बाळराजे

बाळराजे

1 min
17


महाराष्ट्राच्या पावन मातीत

शिवनेरीचे किस्से ताजे झाले..!

नगारे- तुतारीच्या निनादात 

बाळराजे जन्माला आले..!!


 कथा सांगून शूरवीरांच्या 

पेरली स्वराज्याची बीजे..!

मांसाहेब जिजाऊंच्यासंस्कार 

सावलीत घडले बाळराजे..!!


वयाने लहान जरी 

बाणा मात्र करारी..!

नीती -क्रांतीच्या रक्ताची

 नवनिर्मितीची भरारी..!!


तल्लीन होऊन ऐकी 

थोर संतांचे चरित्र..!

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील 

मावळेच त्यांचे सच्चे मित्र..!! 


जात-धर्म लहान-मोठा 

सारं विसरून जायचे..!

मावळ्यांची कांदाभाकर 

ते आवडीने खायचे..!!


असे बाळराजे आपले 

जिजाऊ त्यांच्या आदर्श..!

एकजुटीचा पाया रोवून 

केला मानवतेला स्पर्श..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational