STORYMIRROR

SURAJ GIRMAL

Inspirational

3  

SURAJ GIRMAL

Inspirational

थांब थोडंसं...

थांब थोडंसं...

1 min
209

हताश होऊन झाडाखाली बसलो होतो ,

क्षणभर विसाव्या चा गारवा शोधीत होतो ,,,

तोच झाडाची सळसळणारी पानं

समजावू लागली मला ,,,

" थांब थोडंसं , ! अजून सार काही संपलेल नाही ! "


निर्मनुष्य रस्त्यावरून एकटाच भटकत होतो ,

कदाचित हरवलेल्या वाटा शोधू पाहत होतो ,,

अचानक पायाखालचा रस्ता,

आज थोडा जास्त च बोचू लागला ,

जणू मला समजावू लागला ,,

" थांब थोडंसं ,,!


प्रवासाचा कंटाळा इतक्यात करू नको !

कारण मी अजून संपलो नाही ."

खिडकीतून दूरवर पसरलेल्या अंधाराकडे पाहून

मन सैरभैर व्हायचं ,,,

या अंधारात हरवलेली स्वप्न शोधताना गलबलून यायचं ,,,

तोच वाऱ्याची एक हळूवार झुळूक स्पर्शून सांगून जायची ,,,

" थांब थोडंसं ,,,


येईल सकाळी पुन्हा आशेचा किरण ...,

या काळोखातही विजयाची आशा संपलेली नाही !"

मान वर उंचावून निळ्या समुद्राकडे पाहताना ,,

सार काही ओसाड भकास वाटू लागलं ,,

एकटेपणा जीवघेणा बनू लागल ,,

तितक्यात संध्याकाळी घरी परतणारा

पक्ष्यांचा थवा हळून कानात कुजबजला ,,,

" थांब थोडंसं ,

आम्ही आहोत सोबतीला ,,

तुझ्या माणसांनी तुझी साथ सोडली म्हणून काय झालं ,,,

निसर्गाने अजून तुझा हात सोडलेला नाही ,

निसर्गाने अजून तुझा हात सोडलेला नाही ...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational