आरशातील
आरशातील
सगळ्यांना फसवता येईल
पण जरा जा आरशासमोर
आणि घाला डोळे त्या समोरच्याच्या डोळ्यात
येईल का त्याला फसवता??
खोटं बोलत असाल जगाशी
पण येईल का खोटं सांगता त्याला?
जगाने तुमचं कौतुक केलं तरी
तुमचं खरं रूप हे त्याला ठाऊकच आहे
तो नाही करणार तुमची वाहवा...
मोठं व्हायचं असेल तर आधी
आरशातल्याच्या नजरेत व्हा
त्याच्या नजरेला नजर देऊन
बोलता आलं पाहिजे
प्रामाणिक राहावं आरशातल्याशी