STORYMIRROR

Mrunal Uke

Inspirational

3  

Mrunal Uke

Inspirational

...आत्मनिर्भर भारत...

...आत्मनिर्भर भारत...

1 min
1.1K

दिली जाते रोजच इथे, राष्ट्र निष्ठेला अग्नि

करुनी अहंकार, स्वार्थ अन् लालसेची नशा!

किमान नको तो शुद्र शृंगार देशप्रेमाचा, 

हिच उरलिय मनाच्या गाभाऱ्यात आशा !!


तळी जागणारा निखारा उफाळून येतो .. 

कधी आठवाने वर !

शहारून येते कधी अंग, पाहून हा भ्रष्टाचार,

उले अन सले अंतर !!


दिमाखात सारे नाटोनी थटोनी,

शिरी टाकिती धगधगते निखारे!

परंतु तुझ्या मुर्तिवाचून देवा,

मला वाटते हे राष्ट्र अंधारले !!


युगमागुन चालली रे युगे,

येऊनी ठेपला निर्णायक क्षण!

अखंड भारताचे स्वप्न आर्जव करती..,

पिसाटापरी केस पिंजारून हे म्हणती,

 एक विधान एक निशाण !!


क्षत विक्षत असे ते वास्तव्य

अवलंबुन दुसऱ्या देशावर!

साकरण्या स्वतंत्र असे अस्तित्त्व,

बनवूया भारत आत्मनिर्भर!!!


अमर्याद भारता तुझी थोरवी अन्

मला ज्ञात‌‌ मी एक धूलिकण

अलंकारण्याला परी पाय तुझे

धुळीचेच आहे मला भुषण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational