STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Inspirational

3  

विजयकुमार देशपांडे

Inspirational

अजून संभ्रमात मी .. !

अजून संभ्रमात मी .. !

1 min
222

कोठे राव सुखी एखादा 

तिरंगा अपुल्या गाडीवरुनी 

मित्रासोबत पिचकारी मारत 

मस्तीत हसत मिरवतो


कोठे रंक दु:खी एखादा 

तिरंगा अपुल्या हाती घेउनी  

पोरासोबत आर्जव करत  

चौकाचौकात फिरत विकतो


देशप्रेमाचे हे एकच नाणे 

देशभर मी आजही बघतो 

बाजू नाण्याची खरी कोणती 

अजून संभ्रमात मी पडतो.. !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational