STORYMIRROR

Mahesh V Brahmankar

Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Inspirational

वैद्यकीय प्रतिनिधी

वैद्यकीय प्रतिनिधी

1 min
194

डॉक्टरांना औषधांची माहिती देणारा वैद्यकीय प्रतिनिधी!

ही व्यक्ती असते खूप हजरजबाबी, मेहनती आणि जिद्दी!!

आपल्या प्रोडक्टचे सर्वाधिक ज्ञान ठेऊन, डॉक्टरांकडून त्याचे prescription काढणे, हे त्याचे असते नियमित काम!

कष्ट करून, सर्वांना तोंड देऊन, महिन्याचे टार्गेट पूर्ण करण्याचा मिळतो त्याला दाम!!१!!


कुटुंबाला सांभाळून, मेडिकल, रिसेप्शन, डॉक्टर, स्टोकिस्ट, डेपो तथा मॅनेजरांचा सामना करणारा सुपर योद्धा असतो एक MR !

एवढे करून, स्वतःचा आदर मिळवण्यासाठी नेहमी झुंजणारा, व त्याला जपणारा असतो एक तो सुपरस्टार!!

डॉक्टरांचे conversion करण्याची असते त्याच्यावर जबाबदारी!

प्रत्येक नवीन prescription, त्याला देते काम करण्याची नवीन उभारी!!2!!


टार्गेट केल्यावरच त्याला मिळतात चांगले incentive आणि increment!

आजच्या तारखेत हे मिळणे आहे कठीण, हे सांभाळता नेहमी भिती असते त्याला कधीही पडेल त्याची विकेट!!

पण रुग्ण उपचारासाठी चांगले औषध व त्याच्या उपयोगाची डॉक्टरांना माहिती देणाऱ्या या व्यावसायिकास मिळावे योग्य मानधन!

शासनाने व कंपन्यांनी द्यावी त्याला जॉब सेक्युरिटी, व ठरवावे त्याचे 50000 किमान वेतन!!


सर्व नोकऱ्यांमध्ये मानतो मी या नोकरी व्यवसायाला!

बुद्धीजीवी डॉक्टरांना आपल्या प्रोडक्टची माहिती देऊन रुग्णसेवा करणारे तुम्ही, जरा मान द्या स्वतःला!!

एक वैद्यकीय प्रतिनिधी बनु शकतो जगातील सर्वांत यशस्वी व्यक्ती!

कारण तिच्यातच असतो ठासून भरलेला आत्मविश्वास, म्हणून म्हणतो तिच्यासम नाही दुसरी प्रतिकृती, नाही दुसरी प्रतिकृती!!4!!


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational