STORYMIRROR

BABAJI HULE

Inspirational

3  

BABAJI HULE

Inspirational

एक सायंकाळ - सागरकिनारी...

एक सायंकाळ - सागरकिनारी...

1 min
302

नभ दिसत नव्हते आकाशी 

सोनेरी किरणे पडले होते पायापाशी ;

आपल्या लेकरांच्या ओढीने

पक्षांचे थवे उडती घरट्याकडे जोडीने.   II १ II


फेसळणाऱ्या समुद्राच्या लाटा

खुणावत होत्या रेगांळणाऱ्या मनाला ;

निळ्याभोर आभाळाची साथ होती 

अथांग सागराच्या पलीकडे मावळत्या सूर्याला.     II२ II


हिरवागार शेला पांघरलेली धरती

नव्या नवरीसारखी नटलेली दिसत होती

अंगाला स्पर्श करून जाणारी 

गार वाऱ्याची झुळूक शहारे आणत होती.     II३ II


बावरलेले मन शोधत होते सैरभर 

स्व:नजरेनेआपल्या कर्मनीतीला दूरवर ;

मागे दिसणाऱ्या रेतीतल्या पाऊलखुणाना

साश्रुपूर्ण नयनांनी समजावीत होतो मनाला.     II४ II

 

बाजूनच जाणारा तरुण युवतीचा घोळका

उडणाऱ्या थेंबानी करत होता मनाला पोरका ;

आठवणींच्या हिंदोळ्यावर रेंगाळत होतो 

पूर्व प्रवासातील सुंदर क्षण मोजत होतो.      II५ II


जाणारा दिवस आणि येणारी रात्र

पृथ्वीचे कधीही न थांबणारे हे चक्र ;

सूचित करत होते जाऊ नकोस भूतकाळात 

रोज उगवणाऱ्या सूर्याच्या तेजाने व्हावे प्रेरित.     II ६ II


सोनेरी आठवणींचा तराजू हेलकावतो 

दोलायमान स्थितीत आजूबाजूला डोकावतो ;

आजचाही शुभ दिवस मावळला 

आयुष्यातील एक दिवस कमी झाला .  II ७ II


नाही थांबत काळ आणि वेळ कोणासाठी 

आपणच का थांबावे मागे गेलेल्या क्षणांसाठी ;

धावावे येणाऱ्या उद्याच्या दिवसांसाठी

नव्या ऊर्जेने सिद्ध व्हावे पुढील कार्यासाठी .     II८ II


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational