गोड बोला
गोड बोला
हो मान्य आहे मला,
सोप्पे नाही मार्ग हा.
तरीही थोडे प्रयत्न करुन बघा ना
नाही जास्त पण एकदा तरी गोड बोलून बघा ना.
कसा असतो प्रवास हा,
एकदा अनुभव करुन बघा ना.
तोटे तर नक्कीच होणार नाही
नफ्याचा आशेत एका क्षणाला तरी गोड बोलून बघा ना.
दररोज पेक्षा आज काही,
नवीन करुन बघा ना.
अशक्य वाटणारी गोष्ट ही,
शक्यतेत परिवर्तित करुन एकदा गोड बोलून बघा ना
