कळेना
कळेना
1 min
190
का झाले,
काय झाले,
कसे झाले,
केव्हा झाले,
काहीच कळेना
पण एक मात्र नक्की
तो गमावलेला विश्वास आता पुन्हा जुळेना.
कोणी केले,
काय केले,
यांनी केले,
त्यांनी केले,
काहीच कळेना
पण एक मात्र नक्की
तो हरवलेला गोडवा आता पुन्हा मिसळेणा.
कमी झाले,
जास्त झाले,
इतके झाले,
तितके झाले,
काहीच कळेना
पण एक मात्र नक्की
तो हक्काचा हक्क आता पुन्हा जमेना.
