असावी एक मैत्री अशी पण
असावी एक मैत्री अशी पण
1 min
443
असावी एक मैत्री अशी पण
अनोळखी मैत्रीपासून तर ओळखीपर्यंत
मित्रावर विश्वास दाखवणारी
धाडस करून त्या मित्रा बरोबर
त्याच्या बोलण्याला अर्थ देणारी
समजून घेताच त्याच्या सुखा दुखाला
स्वतःची परवा न करणारी
प्रत्यक्षात भेट झाली असली किंवा नाही
तरी त्या मित्रावर प्रामाणिक असेल याची स्वतःला खात्री पटवून देणारी
असावी एक मैत्री अशी पण
समस्यांच्या सुरुवातीपासून तर अडचणीच्या शेवटपर्यंत
मित्राबरोबर ठामपणे उभी राहणारी
गोष्ट कुठली ही असो
मित्राला चूक अचूक याची जाणीव करून देणारी
मित्राच्या अवघड प्रश्नाची कोडी चे उत्तर शोधून सोडवून देणारी
असावी एक मैत्री अशी पण
