STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

गुरू दत्त दिगंबर

गुरू दत्त दिगंबर

1 min
423

अनसूयेपोटी आले

ब्रह्मा, विष्णू, महेश्वर

दत्तात्रेय म्हणे कुणी

दत्त गुरू दिगंबर


अत्री ऋषींच्या आश्रमी

जन्मा आले दत्तगुरू

तीन मुखे सहा कर

हाती त्रिशूळ डमरू


पायी खडावा घालून

कंठी रुद्राक्षाची माला

हाती काठी कमंडलू

चिता भस्म सर्वांगाला


बसायला व्याघ्राम्बर

छाया धरी औदुंबर

सवे धेनू सह श्वान

ध्यानी बसे दिगंबर


दत्त विष्णू अवतार

देती शिकवण मोठी

गुरू असावा जीवनी

आयुष्याच्या हितासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational