STORYMIRROR

Milind Khandare

Inspirational

3  

Milind Khandare

Inspirational

बंध नात्यांचे

बंध नात्यांचे

1 min
429

नात्यात गरज असते,

कधी कधी

समोरच्याला मोकळीक देण्याची...

कधी काहीच मोजक्या क्षणांसाठी

कधी रात्रीच्या संपूर्ण प्रहरासाठी


नात्यात गरज असते...

कधी नात्याच्या गाठी घट्ट विणण्यासाठी

कधी झालेला गुंता सोडवीण्यासाठी


नात्यात गरज असते....

कधी भविष्यातील स्वप्न रंगवीण्यासाठी

कधी भूतकाळातील आठवणी स्मरण्यासाठी


नात्यात गरज असते....

कधी समोरच्यास्तव जगण्यासाठी

कधी समोरच्याच होऊन जगण्यासाठी


नात्यात गरज असते....

कधी नात्याचं महत्व सांगण्यासाठी

कधी नकळत जाणीव होण्यासाठी


नात्यात गरज असते...

कधी स्वतःला समोरच्यात हरवण्यासाठी

कधी समोरच्यात स्वतःला शोधण्यासाठी


नात्यात गरज असते....

कधी त्यातली जबाबदारी समजून घेण्यासाठी

कधी त्या जबाबदारीस पात्र होण्यासाठी


नात्यात गरज असते...

कधी नाजूक नात जपण्यासाठी

कधी तेच नातं फुलविण्यासाठी


नात्यात गरज असते....

कधी साचलेली धूळ पुसण्यासाठी

कधी सोनेरी रंग शिंपडण्यासाठी


शेवटी...

ही मोकळीक कसली तर,

कधी सतत चाललेल्या लपंडावाच्या खेळापासूनची...

कधी एकमेकांपाठी सुरू असलेल्या धावपळीपासूनची..

आणि गरज पडलीच तर,

कधी कधी एकमेकांवर जीव लावायची सुद्धा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational