सुट्टीची "आठवण"
सुट्टीची "आठवण"
आठवणींना पण सुट्टी असती तर
किती छान झालं असतं जर आठवणींना असती सुट्टी
केलीच नसती कशाची काळजी
ना केली असती कशाची मस्ती
ना जमली असती कुणाशी गट्टी
केलाच नसता कसलाच खटाटोप
ना केली असती कुणाशी मैत्री
ना केलं असतं कुणावर इतकं प्रेम
ना केली असती कुणाची मनधरणी
केलीच नसती कशाची साठवण
ना केली असती गंमत जंमत
तेव्हा तरी कळली असती का मनाची साद
तेव्हा तरी कळली असती का खोल मनाची आस....
असंख्य वाटेने गेलो तरी हे तितकंच खरं आहे...
आठवणीतच आयुष्याचं सार आहे
कारण प्रेमाची ती साद आहे...
