नातं मनातलं.....मैत्री
नातं मनातलं.....मैत्री
कितीही कंटाळलो
कितीही वैतागलो
कितीही रागावलो
तरी जवळची वाटते ती मैत्री...
हक्क असतो
प्रेम असतं
रुसवे फुगवे तर खूपच जास्त
"नाटक नको करू" म्हणणारी पण मैत्रीचं
प्रोत्साहित करणारी,
मनमुराद दाद देणारी,
त्यातूनच आपला कान पिळणारी
नकळत खोपर मारून डोकं ठिकान्यावर आणणारी...
मनात काही न ठेवता आपली चूक आईवडिलांप्रमाणे समजावून सांगणारी..... मैत्री
शब्दांना ही प्रेमात च व्यक्त करावं लागतं असं काही नसतं तीच मैत्री,
कितीही दूर वाटलो तरी जवळ असणारे ती खरी मैत्री
तासनतास कुठल्याही विषयावर गप्पा मारून
मन मोकळे पणाने बोलून हसणारे,
व्यक्त होणारे,म्हणजे मैत्री.....
झालं बोरं मारून!
किती गंडवशील!
झाल्या आठ्या मारून!
एक ना अनेक शब्दप्रयोग वापरून वातावरण हसत खेळत करणारी ....मैत्री
कंटाळी अशील म्हणून माझी आठवण आली इतक्या दिवसांनी...हे जरी खरं असलं तरी राग न धरता मनमोकळे पणाने वाहवत जाणारी म्हणजे मैत्री...
न काही सांगता फक्त हक्काने रडण्यासाठी खांद्यावर डोकं टेकवून घेणारी...मैत्री
खळखळून हसवणारी असते ती खरी मैत्री
कितीही वर्षांनी भेटलो तरी नवी वाटणारी
ऊर्जा देणारी आणि नवी उमेद जागवणारी....
मैत्री
अशा या अवखळ, खट्याळ, मनमुराद नात्याला कोणतं नाव असेल तर मैत्री....
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा
