"शब्द"
"शब्द"

1 min

12K
"शब्द" हे फुलपाखरा सारखे वापरावे
नाहीच दिलं सुख त्यांनी
परी दुःख नं द्यावे
स्वछंदी बागडावे
फुलांचा रंग व्हावे
सूर्य तेजात उजळून यावे
हेवे दावे ना कधी आचरावे
आनंदी रहावे
प्रेमात न्हाऊन जावे
आसमंतातल्या रंगांप्रमाणे
शब्दकोशात हरवून जावे
आचरावे मनीचे भाव
अंतरंगीचे गुज ऐकावे
गीत मनीचे रचावे
शब्दसुमनापरी पल्लवीत व्हावे
स्वप्नवेलीत सुगंधि सुमने फुलावे
शब्दात शब्द गुंफत जावे