बालपण
बालपण
रोज घडो मज देवा
बालदिन तो सुखाचा
आठवतो आज मज
हेवा व्हावा तो सुखाचा।।धृ।।
रोज खेळणे निर्भेळ
बिनधास्त बिनघोर
सूर्य चन्द्र एकरुप
डाव चाले तो सुखाचा।।१।।
खेळ लिघ्घोरी ती कधी
खेळी लपंडाव कधी
धब्बाकुटी अधि -मधी
काळ होता तो सुखाचा।।२।।
चेंडू फळी विटी दांडू
कट्टी बट्टी किती भांडू
नदी कि पहाड बोल भिडू
भरजरी तो सुखाचा ।।३।।
ओली सुकी रोज चाले
डावे उजवे सुचले
पास वरपास भाले
किती रूतले सुखाचे ।।४।।
रोज शर्यतीला ससा
कानी हात ठेवी जसा
असे चन्द्रावर ठसा
असा व्हावा तो सुखाचा।।५।।
