बालपण सुखाचे...
बालपण सुखाचे...
बालपण सुखाचे ...
अजाणतेच्या बालकळ्यांनी सजली होती अवखळता...
कधी साबणाच्या बुडबुड्यांत तर कधी रमली बिलोरी गोट्यांच्या खेळात...
गोड सुखाचे सोहळे लाडाकोडाचे...
मखमाली अंगाईगीतांचे अन् लडीवाळ गालगुच्च्यांचे...
रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसूचे तर कधी झरे हास्यांचे...
नीती ,प्रेरणेचे कोडे घालून गेली अवखळता...
कळलेच नाही कधी...
शैशवाचा पायथा तारुण्याच्या शिखरावर पोहोचला...
हलकेच स्वप्नफुलांसह काट्यांवरही रेंगाळला...
स्वप्नांचा रिमझीमता पाऊस अपेक्षांच्या आेझ्याखाली दमला...
तारुण्याच्या उंबरठी उद्घोष जबाबदाऱ्यांचा...
पालकत्वाच्या जबाबदारीत अडकून पडला...
होता खरंच बालपणीचा काळ सुखाचा...!!!
