बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे


हिंदूहृदयसम्राट, नावाप्रमाणे कार्य अफाट
बाळासाहेब ठाकरे नाव गाजतय भारतभर
थोर समाजसुधारक, महान पिता प्रबोधनकार
ज्यांचे आदर्श संस्कार, महाराष्ट्राचे भाग्यथोर
बाळासाहेब ठाकरे हे नाव शोभून दिसे खरोखर
त्यांच्या अगाध कार्याचा डंका गाजतोय भारतभर
आले जन्मास सामान्य कुटंबात, गरीबीत शिक्षण घेवून
विचाराचे अगाध धन, तेजस्वी बुद्धी चातुर्य महान
प्रखर देशभावना त्यांच्या स्वभावात, अन्यायाची चिड रक्तात
गोरगरीबांचा दाता, अनाथांचा नाथ, दिली गोरगरीबांना साथ
शिवसेना पक्ष स्थापून, गोरगरीबांचे आशास्थान
दीन दुबळ्यांचे केले कल्याण, मोठे मोठे पदे देवून
सामान्य माणूस बनवला, आमदार आणि खासदार
पाठविले भारताच्या संसदेत, साहेबांचे थोर उपकार
गोरगरीब शेतमजूर, शेतकरी आणि कामगार
त्यांच्या जगण्याचा प्रश्न येई त्यांच्या मनात विचार
गोरगरीबांस दिला जगण्याचा कायम आधार
सोडविला पोटापाण्याचा कायमचा प्रश्न गंभीर
वारसा समाज कार्याचा, आदर्श पुढील पिढीचा
नव्ह्ता लोभ पदाचा, ध्यास होता लोकसेवेचा
समाज कार्य करण्याचा मराठी माणूस जगवण्याचा
मराठी बाणा टिकविण्याचा, मराठी भाषा टिकविण्याचा
खरोखर त्यांचे उपकार, इतिहासाचे शिल्पकार
वाघासारखे होते निडर, निर्णय क्षमता होती खंबीर
आदर्श महाराष्ट्र घडविला त्यांच्या आदर्श विचारावर
संकट काळात होते आधार, मराठी माणसाचा नित्य विचार
मराठी माणसाच्या मनामनात, मराठी माणसाच्या रक्ता रक्तात
बाळासाहेब ठाकरे हे नाव राहील कायम स्मरणात
नोंद सोनेरी अक्षरात, राहील सूर्य चंद्राच्या साक्षीत
राहील कायम ध्यानात, राहील कायम इतिहासात.