STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

5.0  

Pandit Warade

Inspirational

बाकीच आहे

बाकीच आहे

1 min
1.0K


बाकीच आहे


पावसाळा लागणे बाकीच आहे।

स्वप्न हिरवे पाहणे बाकीच आहे।।१।।


लोपले जे काळजाच्या आत काही।

ते सखीला सांगणे बाकीच आहे।।२।।


हात हाती घेतला अन चाललोही।

सोबतीने चालणे बाकीच आहे।।३।।


जाहले पाहून सारे विश्व सुंदर।

अंतरी डोकावणे बाकीच आहे।।४।।


झाकले पापास आताशा कितीही।

मात्र लज्जा झाकणे बाकीच आहे।।५।।


रंगलो रंगात येथे खूप साऱ्या।

प्रेमरंगी रंगणे बाकीच आहे।।६।।


चालले आयुष्य सारे झोप घेता।

रात सरली जागणे बाकीच आहे।।७।।


माय बापा पोसतांना लाज वाटे।

पाप करता लाजणे बाकीच आहे।।८।।


जीवनाच्या अंतकाळी जाग आली।

माणसा सम वागणे बाकीच आहे।।९।।

**************


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational