Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankit Navghare

Inspirational

3.0  

Ankit Navghare

Inspirational

बाकी आहे

बाकी आहे

1 min
12.4K


अजून कित्येक कवितांना जन्म देणे बाकी आहे

या आकाशात अजून एक सूर्य येणे बाकी आहे


आजही भडकतेय आग हृदयात आणि राग नाकी आहे 

आठवले आठवले तुझ्याशी एक जुना हिशेब बाकी आहे


इतक्यातच कसे संपले युद्ध अजून शेवटचा वार बाकी आहे

कधीकाळी केला होता तो माझा नियतीशी करार बाकी आहे


ही तर सुरुवातच होती आता अख्खा संहार बाकी आहे

आणि मी जिंकण्यासाठीच तर तुझी ती हार बाकी आहे


मी कुणी एक तारा अथांग हे सारं आकाश बाकी आहे

रात्र काळोखाची पण त्या काजव्यांचा प्रकाश बाकी आहे


जाताना सरणावरी कवितांकडे माझ्या शेवटचे बघणे बाकी आहे

काय बरे लिहायला घ्यावे आता अजून एक रात्र जागणे बाकी आहे 


Rate this content
Log in