बाई
बाई
तूच ठरव तुझ्या आयुष्याचा रंग,
तूच ठरव जगण्याचं मर्म
जो तो तुला गृहीत धरले
मत तुला ही आहे,हे वेळोवेळी सांग
तुला असतात सगळेच प्रिय,
तुझ्या भावविश्वात त्यांची लुडबुड
का दर वेळी सहन करतेस?
पत्नी,आई,बहीण,सून,मुलगी,
किती किती नात्यात भरडतेस?
स्वतः त्व जप आणि अस्तित्व टिकवून ठेव
माणूस आहेस हे आधी लक्षात घे
मनात असेल ते मोकळेपणाने सांगत जा
बाई आहे मी,म्हणून गप्प आता राहू नकोस
कर आताच सुरुवात आणि रंग नवे भर
बाई आहेस म्हणून "बाई" म्हणूनच जगू नकोस
समाप्त
