बाहुली
बाहुली
बाहुली मैत्रिण माझी पहिली
वाटायचे दिसायचे मला तीच्याच सारखे
घारे डोळे, नकटे नाक, लांब काळे केस
सडपातळ सुरेख शरीर बांधा
रंग तो गोरा गोरा!
पण जन्मानेच घेऊन आले रंग माझा सावळा!
मग फासून पावडर चेहर्याला करत असे चेहरा माझा पांढरा!
तरी सर नव्हती बाहुलीच्या रंगाची
रड रड करून घालत बसे आईसमोर गोंधळ!
आई मला समजावे तू कशी माझी साजरी बाहुली
चालते बोलते रडते कशी
घालते छान छान फ्रॉक
नाचते बागडते, देते सर्वांना मान!
बाहुली तुझी आहे एक निर्जिव खेळणे!
पण तु तर आहे माझी सजीव लाडकी बाहुली!!
आईच्या त्या प्रेमाने गोंजरण्याने
समजला तो फरक खऱ्या बाहुलीचा आता!!
