बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब पुरंदरे
*बाबासाहेब* *पुरंदरे* आपणास शतशः प्रणाम...
थोर व्यक्तीमत्व
इतिहासकार
महा जाणकार
हेच सत्व ...
शिवबा चरीत्र
अभ्यासले आज
चढविला साज
तो सर्वत्र ...
बाबा साहेबांनी
केले परिश्रम
लेखन सक्षम
ग्रंथार्पणी ...
जाणत्या राज्याचे
नाट्य दिग्दर्शन
हरपले मन
प्रेक्षकांचे ...
हे बाबासाहेब
महाराष्ट्र शान
मोठाच सन्मान
राखू आब ...
मराठी मातीस
लाभला हा हिरा
शिकविला खरा
इतिहास ...
फुल आसवांचे
चरणी अर्पण
कसे दुःख कण
सोसायचे ...
जनांचीच इच्छा
पुन्हा जन्म घ्यावा
भाग्योदय व्हावा
ही सदिच्छा ...
हीच शब्दावली
ओळ मी रचली
चरणी वाहिली
श्रध्दांजली ...
