बाबा
बाबा
लाडात वाढलेली लेक
मांडवात उभी पाहून
हसऱ्या चेहऱ्यानं बाप
मुसमुसत होता राहून राहून // धृ//
कोपऱ्यात उभा बाप
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
डोळे पुसत होता!होता
काळजाच्या तुकड्याला पाहून
आतून तुटत होता
पोरीचं चांगलं झालं
हसून म्हणत होता !!
अश्रूंचा बांध त्यानं
अडवून धरला होता
डोळ्यासमोरून लेकीचा चेहरा
दूर होत नव्हता!!!
