बाबा
बाबा
गाडगे महाराजांना पाहावे किर्तनात
बोलायचे अत्रे नेहमी
अस्वच्छतेच्या उच्चाटनासाठी
किर्तनातून केलेले प्रबोधन आले कामी
राष्ट्रसंत हा नव्या विचाराचा
लाभला हे नशीब भारताचे
लोककल्याणा आयुष्य वेचले
त्यागीले दार स्वार्थाचे
विचित्र पेहरावाचा हा देवमाणूस
दिन- दुबळ्यांचा कैवारी झाला
गावोगावं खराट्यानं झाडंत
डोकी गाडगं पांघरलेला बाबा आला
मुर्तीपुजा करू नका
मंत्रतंत्र म्हणू नका
सावकारांचे कर्ज काढू नका
दिसत असता आंधळे बनू नका
शिकवण ही बाबांची
त्यांच्या स्वच्छतेसारखी स्वच्छ होती
पेटवून गेले ते गावोगावी
ग्रामस्वच्छता अभियानाच्या वाती
