STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Drama Romance Tragedy

4  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Drama Romance Tragedy

बाबा माझं लगिन करा!

बाबा माझं लगिन करा!

1 min
350

बाबा लगिन करा

माझं लगिन करा

आवंदा तरी करा

बाबा लगिन करा


चार वरीस झाल्यात

एमेस्सी अॅगरी होऊन

'सुशिक्षित बेकार' शिक्का

जगतोय भाळी घेऊन


थकलो एमपीएस्सीचा

अभ्यास करून करून

कधी परीक्षा झाली रद्द

कधी मार्कांची सरहद्द


करतोय शेती आपली

ह्योच का माझा गुन्हा

हरवलाय पाऊस यंदाबी

दुष्काळ पाचवीला पुन्हा


पाव्हणे ईकडं फिरकेना

पोरीबाळी गावात देईना

सगळ्या तरण्याची दैना

कवा मिळंल आम्हा मैना


तुमी बी आता थकलाय

जीव आईचाबी दमलाय

सुनमुख कधी हो बघणार

नातवांना कधी खेळवणार


मामा मामीचं पाय धरा

धाकलीला मागणं घाला

कायबी करा कसबी करा

वैशाखात तरी मुहूर्त धरा


बाबा लगिन करा

माझं लगिन करा

आवंदा तरी करा

बाबा लगिन करा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama