बा.भीमा..
बा.भीमा..
धर्मांच्या ठेकेदिरांनी स्वरूप बदलले आहे
सावध रहा बांधवांनो थंड डोक्यांची तुफाने भोवतालीच वावरत आहेत
आकाशाला छिद्र पाडण्याचा पोरकट यज्ञ सुरू आहे
थेंबाथेंबाने सुर्याला विझविणयाचे छद्मी पोरकट षडयंत्र सुरू आहे
गटागटाला विभागुन समतेचा पाठ सुरू आहे
सावध रहा बांधवांनो थंड डोक्याची तूफाने भोवताली वावरत आहेत
जाती निर्मुलनांच्या भाकड कथा तुकड्या तुकडयात ङवाटल्या जात आहेत
विचारांचे सुरुंग कोवळ्या मनामध्ये सुद्धा कावेबाज पणे पेरले जात आहेत
ज्ञानसुर्याला झाकोळून फडफडणारया दिव्यांचे अंतिम डाव टाकणे सुरू आहे
धर्माच्या शस्राला पाझर लावणंही बेमालूम पणे सुरू आहे
आकाश पाताळ एक होतय भीमा तुला मिटवायला
तुझ्या तेजाने पावन झालेल्या कोट्यावधी ज्योती समर्थ आहेत
तुला ज्ञानदिप पेटवायला तू तर नसानसात भिनलेला श्वास आहेस
पिढयानपिढया बाटलेलया शोषितांची आस आहेस
आणि ज्यांनी बाटवलय त्यांची दुखरी नस आहेस
हजारो वर्षांचा जुलमी ईतिहास एकटयाने ऊपटून काढलास
अन्यायाशी झुंजण्याचा बाणा रकतात पेरलास जातींच्या पोशिदयांना पुरून ऊरलास बा!
भीमा तुला ऊभा जन्म फक्त तुलाच समजुन घ्यायचे आहे
आभाळातला तो सुर्य धरणी वरचा तु दुसरा तुझ्या तेजाच्या सामर्थ्याचा एक किरण मला दे
इथल्या क्रूर कपटी छद्मी षडयंत्राशी मला माझ्या नसानसात भिनलेलया तुझ्या विचारांनीच लढायच आहे
