अवकाळी
अवकाळी
नको असताना
बरसला अवकाळी
पाहता पाहता शेतात
परिस्थिती झाली दुष्काळी
मका फुटे कोंब
बाजरी कणसात उगवली
कापसाचा काळेपण
किंमत कोलमडली
चिभाडली शेत सारी
मजुर मिळेना
शेतकरी यातना
कोणासच कळेना
हाता तोंडाचा घास
ओला दुष्काळाने घेतला
शेतकऱ्याने शेतात
देह आपला लटकवला
