अविष्कार कराया
अविष्कार कराया
या रे या रे बालकांनो
शाळेतं रे या या।
नका राहू घरी तुम्ही
शिकण्यासाठी या या।।धृ।।
शाळा हे तुमचे घर
शिक्षक हेची माता-पिता
मुलांच्या गुणवत्तेची
सदैव असे चिंता
नका लावू बाळा,हो..,फेऱ्या माराया।।1।।
शिक्षक आहेत फारच छान
शाळा आहे नटून-थटून
बाग बगीचा फुललेला
वर्ग आहे सजलेला
सौंदर्याच्या कुशीत,हो..,मन रमतोया।।2।।
बालकांनो तुमच्या अंगी
विविध सुप्त कला
कलेची जाणीव होण्या
यावे नक्कीच शाळेला
शिक्षणाची गरज,हो..,जीवन जगाया।।3।।
आता गुरुजी,मॅडम
विविध कलेत निपुण
विविध खेळ खेळविती
विविध त्यांचे उपक्रम
चला कृतियुक्त,हो..,प्रकल्प करू या।।4।।
विद्येविना नाही उद्धार
विद्येविना नाही उपाय रं
धरा शिक्षणाची कास
मनी ठेवा एकाच ध्यास
सर्वांगीण गुणांचा,हो..,अविष्कार कराया।।5।।
