अतूट प्रेम
अतूट प्रेम
प्रेम दोघांत इतके अतूट असावे,
की सोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहावी l
एकाच्या काळजात जी धडधड व्हावी,
लगेच समोरच्याच्या काळजात ती जाणवावी l
एकाला आठवण आली की,
लगेच चाहूल दुसऱ्याला लागावी l
बघण्याची एकाला इच्छा झाली,
ओढ लगेच समोरच्याला भासावी l
मन मिलनास एकाचे आतुर,लगेच,
पावले समोरच्याची चालायला लागावी l
दोघे समोरा समोर येताच,
दोघांच्या डोळ्यात ती भासावी l
एकाने मिठीत घेतले तर,
दुसऱ्याने मारून मिठी दोघे एकजीव व्हावी l
ताटातूट कधीच होऊ नये ,
म्हणून मारलेली मिठी घट्ट आवळावी l
प्रेम दोघांत इतके अतूट असावे,
की सोबत हि शेवटच्या क्षणापर्यंत रहावी l l

