अतुलनीय तू
अतुलनीय तू
अ,आ,ई चे धडे दिलेस तू
चुकीच्या गोष्टीस कान पिळलास तू
माणूस म्हणून घडवलस तू
जगणं काय असतं, ते शिकवलंस तू
दिव्यामधील वात तू
अंधारातील ध्रुवतारा तू
अज्ञानीला ज्ञानी बनवलेस तू
कारण, ज्ञानाचा महासागरच तू...
