वसुंधरा
वसुंधरा
1 min
289
सुर्यरुपी कुंकू धारण करून भाळी
हिरव्यागार गवताची अंगावर नेसून साडी
पायात खळखळ वाहणाऱ्या पाण्याचे पैंजण घालुनी
वसुंधरा आज सुवासिनी प्रमाणे नटली होती.
फुलपाखरारूपी बागेत बागडूनी
कोकीळ रूपी संगीत गाऊनी
पावसा रूपी धो-धो रडूनी
वसुंधरा आज एका लहान मुलाप्रमाणे वागत होती.
मयुर रूपी मोरपंखी पिसारा फुलवूनी
लखलखत्या चपला रूपी नृत्य करुनी
उंचवरून पडणाऱ्या धबधब्याच्या ताली
वसुंधरा आज एका तरुणी प्रमाणे नाचत होती
कळीतून फुलात उमलूनी
घरट्यातून उडून उंच भरारी घेऊनी
आपल्या पाण्या रूपी डोळ्यांनी रात्री चंद्राला पाहून
वसुंधरा आज गालातल्या गालात हसत होती...!
