अंधार...
अंधार...
आई, मला आता अंधाराची सवय झालीय
मुक्तपणे चांदणी रातेत संचार करण्याची सवय झालीय
आई मला आता अंधाराची सवय झालीय
आजच्या कलयुगात दिव्याखालील अंधारात जगण्याची सवय झालीय
डोळे मिटून एकांतात झोपण्याची सवय झालीय
आई मला अंधाराची सवय झालीय...
प्रकाशवाटा शोधण्यासाठी गरजेचा असतो तो अंधार...
टीमटीमणाऱ्या चांदण्यांचा लख्ख प्रकाश
पाहण्यासाठी गरजेचा असतो तो अंधार...
खचून जाऊ नकोस मित्रा या अंधाराचा सामना करताना
कारण उद्याची पहाट सज्ज आहे तुझ्या आलिंगनाला...!