सुकलेलं पान
सुकलेलं पान
1 min
186
नदीचे पाणी वाहत होते खळखळ
झाडांवरील पानांची चालू होती सळसळ
तेवढ्यात एक पान नदीत पडले
जीव वाचवण्यासाठी धडपडू लागले
सुकलेले पान रडू लागले
पाण्यातील मासे मात्र हसू लागले
तेवढ्यात वरून एक जाळे आले
माशांना पकडून वर नेले
आता मासे रडू लागले
दुःखी पान हसू लागले
