विसरून सारे काही...
विसरून सारे काही...


कपाळ पडले खुले तिचे
जणू पाण्यावाचून मासे
नशिबाचे फिरले फासे
घरही स्मशान भासे
हातातील हात सुटला
दिस एकांतात जाऊ लागला
आठवणींचा पक्षी उडू लागला
केवळ भासचं होऊ लागला
दिवसाची रात्र झाली
अन् रात्रीचा दिवस झाला
आठवणींचा पक्षी मात्र
तिच्याभोवतीच फिरू लागला
मन केले खंबीर तिने
विसरून सारे दुःख
नवजगात वावरण्यासाठी
ती एकलीच आहे सज्ज