आयुष्य...
आयुष्य...
एखाद्याचे हसणे दिसते, हसण्यामागील दुःख नाही
एखाद्याचे रडणे दिसते, रडण्यामागील भावना नाही
एखाद्याचे बोलणे रुचते, बोलण्यामागील स्वार्थ नाही
एखाद्याचे साैंदर्य दिसते, सौंदर्यामागील मन नाही
एखाद्याची श्रीमंती दिसते, श्रीमंतीमागील कष्ट नाही
एखाद्याची गरीबी दिसते, गरीबीमागील कारण नाही
एखाद्याची श्रद्धा दिसते, श्रद्धेमागील निष्ठा नाही
एखाद्याची अंधश्रद्धा दिसते, अंधश्रद्धेमागील श्रद्धा नाही
आयुष्य हे असंच असतं, कधीही कोणी न समजणारं
तरी कोठून येई हा मीपणा, आपणास सर्वात श्रेष्ठ भासवणारा...?